लष्कर-ए-तोयबाला गोपनीय कागदपत्रे पुरवणार्‍या एन्.आय.ए.च्या वरिष्ठ अधिकार्‍याला अटक

 हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यात आलेल्या मालेगाव बाँबस्फोट आणि समझौता एक्सप्रेस प्रकरणांचे केले होते अन्वेषण !

  • अशा देशद्रोह्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
  • हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यात आलेल्या आणि नेगी यांनी त्यांचे अन्वेषण केलेल्या सर्व प्रकरणांचे अन्वेषण नव्याने करण्यात यावे, अशी हिंदूंनी मागणी केल्यास चूक ते काय ? जिहादी आतंकवादी संघटनेसाठी काम करणारे नेगी यांनी हिंदूंना जाणूनबुजून गोवले, असेच हिंदूंना वाटते !
  • अशा घटनांमुळे जनतेचा पोलिसांवरचा उरला-सुरला विश्‍वासही उडाला आहे ! स्वतःच्या खात्यातील आय.पी.एस्. अधिकारी आतंकवाद्यांच्या संपर्कात असल्याचा मागमूस न लागणार्‍या देशातील सर्वांत मोठ्या अन्वेषण यंत्रणेला कधी देशातील अन्य आतंकवादी कारवायांविषयी माहिती मिळेेल का ? हे त्यांना लज्जास्पद !
  • आतापर्यंत पोलीस गुंड, चोर, दोरोडेखोर, बलात्कारी, भ्रष्टाचारी असल्याचे सर्वज्ञात होते, आता ते आतंकवाद्यांना साहाय्य करू लागले आहेत ! जनता, पर्यायाने देशाला अशा पोलिसांपासूनच खरा धोका आहे !

नवी देहली – पाकिस्तानी जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा हिला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची (एन्.आय.ए.च्या) गोपनीय कागदपत्रे पुरवल्याच्या प्रकरणी या यंत्रणेचे हिमाचल प्रदेशमधील आय.पी.एस्. अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना यंत्रणेकडूनच अटक करण्यात आली. नेगी हे शिमला येथे एन्.आय.ए.चे अतिरिक्त अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक आतंकवाद्याला गोपनीय कागदपत्रे दिली होती.

एन्.आय.ए.ने ६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी नेगी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. यानंतर त्यांच्या घराची तपासणीही करण्यात आली होती. या प्रकरणी नंतर ६ जणांना  अटक करण्यात आली होती.

हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवणार्‍या प्रकरणांचे केले होते अन्वेषण !

नेगी यांनी वर्ष २००७ मध्ये झालेल्या अजमेर दर्गा स्फोटाच्या प्रकरणात अन्वेषण केले होते. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा कथित हात असल्याचे सांगितले गेले. नेगी यांनी वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणातील अन्वेषणातही त्यांचा सहभाग होता; मात्र नंतर त्यांना काढण्यात आले. समझौता एक्सप्रेस बाँबस्फोटाच्या प्रकरणात त्यांनी अन्वेषण केले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद यांना अटक करण्यात आली होती.