काँग्रेसने फाळणीच्या वेळी, तसेच १९६५ आणि १९७१ च्या युद्धांच्या वेळी गुरुनानक यांची तपोभूमी भारतात आणण्याची संधी गमावली ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसने गमावलेली संधी आताच्या केंद्र सरकारने साधावी, असेच हिंदूंना आणि शिखांना वाटते !

पठाणकोट (पंजाब) – भारताच्या वर्ष १९४७ च्या फाळणीच्या वेळी जेव्हा काँग्रेसच्या हातात देश होता, तेव्हा त्यांना हे लक्षात आले नाही की, पंजाब सीमेवरून केवळ ६ किलोमीटर अंतरावर पाकमध्ये असलेली ‘गुरुनानक’ यांची तपोभूमी भारतात असली पाहिजे. काँग्रेसवाल्यांनी पाप केले आहे. आपल्या भावना चिरडल्या आहेत.

वर्ष १९६५ च्या युद्धाच्या वेळी भारतीय सैन्य लाहोरवर तिरंगा ध्वज फडकावण्याच्या सिद्धतेत असतांनाही ही तपोभूमी भारतात आणण्याची संधी होती. वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी ९० सहस्र पाकिस्तानी सैनिक भारताच्या कह्यात होते. पाकने गुडघे टेकले होते. तेव्हा काँग्रेस सरकारने ‘गुरुनानक तपोभूमीच्या बदल्यात या सैनिकांना सोडतो’, असे म्हटले पाहिजे होते.