वर्धा येथे ह.भ.प. मयूर दरणे महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

ह.भ.प. मयूर दरणे महाराज (उजवीकडे)यांना पंचांग भेट देतांना श्री. प्रशांत बाकडे

वर्धा, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील गांधीनगर येथे श्री. फुलझेले परिवाराच्या वतीने ह.भ.प. मयूर दरणे महाराज यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत पार पडलेल्या या भागवत सप्ताहाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने श्री. प्रशांत बाकडे आणि सौ. विजया भोळे यांनी ह.भ.प. दरणे महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. या वेळी महाराजांनी स्वत:हून सनातनच्या साधकांना भागवत सप्ताहाच्या ठिकाणी पितृपक्षानिमित्त प्रबोधन करण्यास सांगितले.

ह.भ.प. दरणे महाराज यांचा धर्मकार्यामध्ये सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रत्येकी १५ दिवसांनी ह.भ.प. आणि कीर्तनकार यांचा ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित केला जातो. या परिसंवादाला येळाकेळी, जिल्हा वर्धा येथील ह.भ.प. दरणे महाराज यांची नियमितपणे उपस्थिती असते.

ह.भ.प. दरणे महाराज यांचे गुरु प.पू. सयाजी महाराज यांनाही सनातन पंचाग भेट !

या वेळी भागवत सप्ताहाला ह.भ.प. दरणे महाराज यांचे गुरु वर्धा येथील प.पू. सयाजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांनाही ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच प.पू. महाराजांनी भक्तांना संबोधित करतांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगून त्यांचा वापर करण्यास सांगितले.