अमरावती जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट !

अकार्यक्षम प्रशासन !

अमरावती – प्रतीवर्षीप्रमाणेच यावर्षीही जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ही पाणीटंचाई उन्हाळ्यामुळे नव्हे, तर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत्जनित्रांची व्यवस्था न करणे, प्रशासनाचा गलथानपणा आणि नियोजनाअभावी पाण्याचा काटकसरीने वापर न करता बेसुमार वापर केल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (याला उत्तरदायी असणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक) या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.