तस्मात् धर्मपरो भवेत् । (धर्मपरायण बना !)

‘अल्‍जेरिया’ देशाचा खेळाडू ‘इमेन खेलीफ’ याने ऑलिंपिकमध्‍ये गैरकृत्‍य केल्‍याचे प्रकरण !

अल्‍जेरिया’ देशाचा खेळाडू ‘इमेन खेलीफ

मनुष्‍य हा स्‍वभावत: स्‍खलनशील आहे. त्‍याला मार्गावर ठेवण्‍याचे काम धर्म करतो. धर्म म्‍हणजे अशी चौकट जी माणसाला भरकटू देत नाही. रज-तमापासून दूर असलेल्‍या आपल्‍या पूर्वजांनी ही चौकट आखण्‍यासाठी आपला अनुभव खर्ची घातला आहे. ‘आम्‍हाला नियम सांगण्‍यासाठी तुम्‍ही आमचे कोण ? काका कि मामा ?’, असे आपण म्‍हणू शकतो किंवा मग ‘आम्‍हाला आमचे आयुष्‍य हवे तसे जगायचे आहे’, असेही आपले मत असू शकते. फक्‍त मग त्‍याचे असे परिणामही भोगायला आपण सिद्ध असले पाहिजे !

वैद्य परीक्षित शेवडे

जन्‍माने पुरुष असूनही ‘मी स्‍वतःला स्‍त्री म्‍हणूनच पहातो’, हा ‘वोकिझम’ (जगभरात प्रस्‍थापित समाजव्‍यवस्‍था, संस्‍कृती आणि कुटुंबव्‍यवस्‍था यांना छेद देणारी विकृती म्‍हणजे वोकिझम) ज्‍या ‘जमात ए पुरोगामी’ने जन्‍माला घातला आणि पोसला, त्‍यांनीच सतत विशेषत: हिंदु धर्म अन् भारतीय संस्‍कृती यांवर विशेष आगपाखड केलेली दिसते. ‘विविध मुखवटे धारण केले, तरी अराजक हाच त्‍यांचा अंत:स्‍थ हेतू असतो’, असे आम्‍ही सतत सांगत असतो, त्‍याचे मूर्तीमंत उदाहरण !

आयुर्वेद म्‍हणतो, ‘सुखार्थं सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः । सुखं नास्‍ति विना धर्मात् तस्‍मात् धर्मपरो भवेत् ॥’

सगळ्‍या प्राण्‍यांचे प्रयत्न सुख मिळवण्‍यासाठी चालू असतात. धर्माचरणाखेरीज सुख नाही. त्‍यामुळे धर्मपरायण बना ! (२.८.२०२४)

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्‍पति, डोंबिवली.