मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई !

महापालिकेने पाडले ९० सहस्र चौरस फुटांचे बांधकाम !

मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे – कर्वेनगर येथे मुठा नदीच्या हरितपट्ट्यातील अनधिकृत बांधकाम, पत्र्याच्या शेड्सवर उच्च न्यायालयाची स्थगिती उठताच महापालिकेने कारवाई केली आहे. १५ मिळकतींवर कारवाई करून महापालिकेने ९० सहस्र चौरस फुटांचे बांधकाम पाडले. (कारवाई करणारे तात्पुरती कारवाई करत असल्याने अनधिकृत व्यावसाय करणार्‍यांना कुणाचाच वचक राहिला नाही. यावर ठोस उपाययोजना काढायला हवी. – संपादक) हरितपट्ट्यात बांधकाम किंवा शेड उभारून व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे महापालिकेने या जागामालकांना नोटीस पाठवली होती. जागामालकांनी उच्च न्यायालयात या विरोधात याचिका प्रविष्ट करून कारवाईवर स्थगितीही आणली होती; मात्र ही स्थगिती २६ जून या दिवशी उठवल्याचा उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने नदीलगत हरितपट्ट्यातील बांधकामांवर कारवाई केली.