बांगलादेशने ‘रामदिया युनियन परिषदे’चे नाव पालटून ‘इस्लामपूर युनियन परिषद’ केले !

नावात राम असल्याने पालटले नाव !

राजबरी (बांगलादेश) – बांगलादेशच्या राजबरी जिल्ह्यातील रामदिया युनियन परिषदेचे नाव पालटून इस्लामपूर युनियन परिषद असे करण्यात आले. रामदिया युनियन परिषदेचे अध्यक्ष म्हणाले, ‘आम्हाला रामाचे नावही ऐकू येता कामा नये.’ (‘आम्हाला मुसलमान आक्रमकांचे नाव ऐकू येता कामा नये’, असे म्हणण्याचे धाडस भारतातील एकतरी हिंदु आणि त्यांचे नेते कधी करू शकतात का ? – संपादक)  एकेकाळी रामदियामध्ये ७५ टक्के लोक हिंदू होते. (एखाद्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक आणि मुसलमान बहुसंख्य झाल्यावर काय होते, याचे हे आणखी एक उदाहरण ! – संपादक) यावरून बांगलादेश किती कट्टर इस्लामी देश बनला आहे, हे लक्षात येते.

संपादकीय भूमिका

भारतात औरंगजेब, अफझलखान आदी असंख्य आक्रमकांच्या नावे आजही अनेक गावे, तालुके, शहरे आदी वसली असतांनाही त्याविषयी कुणी अवाक्षरही काढत नाही ! उलट ही नावे पालटण्याची मागणी करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात ! हे चित्र आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !