मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय १० नोव्हेंबर या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार यापूर्वी असलेली २२७ नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली होती. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या ३.८७ टक्के इतकी वाढली आहे. या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.