८ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या !

क्रूरतेची परिसीमा !


सातारा, १२ मे (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे प्रशांत जामदार या ८ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याविषयी पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, नायगाव येथील प्रशांत गुजर यांच्या शेतावर कर्नाटक राज्यातील जामदार कुटुंब कामाला होते. शेतावर काम करतांना फळे भरून ठेवण्यासाठी रद्दीपेपर आणण्यासाठी प्रशांत घरी आला होता. बराच वेळ प्रशांत माघारी आला नाही. त्यामुळे आईवडील घराकडे आले. शोधाशोध केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह जवळच असलेल्या पपईच्या बागेत आढळून आला.