आता रामराज्य दूर नाही !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

राजगड (मध्यप्रदेश) येथे सायकलवरून अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्‍या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा त्याचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

अशांना मंदिरे पाडून मशिदी बांधणे कसे चालते ?

द्रमुक पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर मांडले.

काँग्रेसवाल्यांचा श्रीरामद्वेष जाणा !

भाजप लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी पाडली, तेव्हा मी अयोध्येला गेलो होतो. नंतर भाजपवाल्यांनी २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला, असे विधान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले आहे.

अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाईच करायला हवी !

केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवरून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले होते. यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे.

बाबराच्या वंशजांना ओळखा !  

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी वर्गणी गोळा करणार्‍या हिंदूंवर गुंड काले खान आणि त्याचे साथीदार यांनी केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचे नेते विनोद कश्यप ठार झाले.

अशांना आजन्म कारागृहात डांबा !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय म्हणाल्या, ‘‘राम बहुदा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. त्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे.’’

मालदीवला धडा शिकवणे आवश्यकच !

आम्ही आकाराने लहान असू; पण त्यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही. मालदीव ही कोणत्याही देशाची संपत्ती नाही, अशा शब्दांत मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी चीनच्या दौर्‍यावरून परतल्यावर भारताचे नाव न घेता त्याला धमकी दिली.

अशी मागणी सर्वत्रच झाली पाहिजे !

अजमेर येथील ‘ढाई दिन का झोपडा’ नावाची मशीद हे पूर्वीचे मंदिर असल्याने ते हिंदूंकडे सुपुर्द करण्याची मागणी भाजपचे खासदार रामचरण बोहरा यांनी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र लिहून केली आहे.

चीन समर्थक मालदीवला धडा शिकवाच !

‘मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये अन्य देशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना चीन पूर्ण शक्तीनिशी विरोध करील’, असे आश्वासन चीनने मालदीवला दिले आहे. याद्वारे चीनने अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे.