अशा अभिनेत्यांना हिंदू डोक्यावर घेतात, हे लज्जास्पद !

नाताळानिमित्त अभिनेते रणबीर कपूर यांनी केकवर दारू ओतली आणि त्याला आग लावली अन् ‘जय माता दी’ असे म्हटले.

काँग्रेसचा भगवान श्रीराम यांच्याप्रतीचा द्वेष जाणा !

‘काँग्रेसला भगवान श्रीरामांमुळे अडचण होती. आता देशात श्रीरामाचे उघडपणे समर्थन केले जात आहे’, असे विधान काँग्रेसची विदेशातील शाखा ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले.

मौर्य यांच्यासारख्यांना कारागृहात कधी डांबणार ?

‘पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदु कोणताही धर्म नाही’, असे म्हटले होते, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी असे विधान केल्यावर भूकंप होतो’, असे द्वेषमूलक विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.

अशा शाळांना सरकारने टाळे ठोकावे !

देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे

धर्मांध मुसलमानांना कायद्याचा धाक नाही, हे जाणा !

केंद्र सरकारने मुसलमान महिलांसाठीचा ‘तिहेरी तलाक’ प्रकार कायद्याद्वारे रहित केला असतांनाही गेल्या ५ वर्षांत आतापर्यंत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक तिहेरी तलाकच्या घटना घडल्या आहेत.

काँग्रेस सरकार म्हणजे इस्लामी राजवट !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यात गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये यांत हिजाब परिधान करण्यावर असलेली बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे.

देशातील सर्वच विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवा !

गुजरातमधील शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाणार आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.

सनातन धर्म नष्ट करू पहाणारे द्रमुकवाले आहेत भ्रष्टाचारी !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री तथा द्रमुक पक्षाचे नेते के. पोनमुडी आणि त्यांची पत्नी पी. विशालाक्षी यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

चिथावणीखोर आव्हान देणारे कायदाद्रोही धर्मांध !

आम्ही आणखी मशीद देणार नाही’, असे चिथावणीखोर वक्तव्य ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी केले.

गदारोळ करणार्‍यांची खासदारकी रहित करा !

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. यामुळे विरोधी पक्षांच्या आणखी ४९ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आता एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.