सनातन संस्‍थेकडे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ होतील, इतके ज्ञान उपलब्‍ध असल्‍याने ग्रंथनिर्मितीच्‍या सेवेसाठी अन्‍य पुस्‍तके वाचण्‍याची आवश्‍यकता नाही !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा ग्रंथनिर्मितीच्‍या संदर्भातील सेवा करणारी एक साधिका मला म्‍हणाली, ‘‘आपल्‍या ग्रंथांत अन्‍य ग्रंथांतील काही माहिती घेऊ शकतो का ?’, या दृष्‍टीने मी अन्‍य ग्रंथांचे वाचन करते. ‘त्‍यातून माझी साधना होईल’, असे मला वाटते.’’ त्‍यावर मी तिला सांगितले, ‘‘आपल्‍याकडेच ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ होतील, इतके ज्ञान उपलब्‍ध आहे. आपल्‍या ग्रंथांच्‍या निर्मितीसाठी या ज्ञानाचा उपयोग करून घेण्‍यातूनच तुमची साधना होईल. त्‍यामुळे अन्‍य पुस्‍तके वाचण्‍याची आवश्‍यकता नाही.’’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले