‘भगवान परशुराम जन्मोत्सव समिती २०२४’च्या निमंत्रकपदी विश्वजीत देशपांडे यांची निवड !

पुणे – शहरातील विविध ब्राह्मण संस्थांची नुकतीच एक बैठक पार पडली. १० मे या दिवशी भगवान परशुराम जन्मोत्सव आहे. या उत्सवाच्या संयोजनासाठी एक संयोजन समिती बैठकीत सिद्ध करण्यात आली असून संयोजन समितीच्या निमंत्रकपदी ‘परशुराम सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली. या वेळी राज्यसभेच्या खासदार प्रा. (सौ.) मेधाताई कुलकर्णी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

या वेळी प्रामुख्याने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी, अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिकचे पुणे केंद्र श्री. विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे श्री. चैतन्य जोशी, सर्वशाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अशोक जोशी, परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.