‘योग जिहाद ?’

काही दिवसांपासून सोहेल अन्सारी या मुसलमान योग शिक्षकाकडून हिंदु मुली ‘योग’ शिकत असल्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. योगाभ्यास करणार्‍या कुठल्याही व्यक्तीला अत्यंत तिडिक जावी, असे हे व्हिडिओ आहेत. योगाभ्यासाच्या नावाखाली त्याने हिंदु मुलींचा गैरवापर करून घेतला आहे आणि हिंदु मुली त्यात फसल्या आहेत, असेच म्हणावे लागेल ! सोहेलची मुलींना योग शिकवण्याची पद्धत अत्यंत अश्लील, बीभत्स आणि किळसवाणी आहे. त्यावर समाजमाध्यमातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. सोहेलकडे महिला साहाय्यक नाही. या सर्व महिला किंवा मुली केवळ हिंदु आहेत. तो अत्यंत अश्लील पद्धतीने सर्वांच्या देखत योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींना स्पर्श करत आहे आणि त्यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत आहे; मात्र अशा प्रकारे तो तिथे योग शिकणार्‍या कोणत्याही पुरुषांना स्पर्श करत नाही, तसेच असा कोणताही व्हिडिओ त्याने पुरुष किंवा मुले यांसमवेत बनवलेला नाही. यावरून योगाच्या नावाखाली नक्की काय चालले आहे ? हे लक्षात येते.

खरे तर ‘व्यक्तीला स्पर्शही न करता, विनंतीवजा सूचना करत आसनस्थितीतील चुका आणि सुधारणा सांगायच्या’, असे आदर्श योगशिक्षकाचे आचरण असते. योगाभ्यासाने जीवन निरोगी आणि स्वस्थ रहाणे शक्य होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, ऊर्जा मिळते. ऋषींनी मानवाला दिलेली ही अद्वितीय देणगी आहे. मुख्य म्हणजे त्यातून चित्तवृत्ती शांत करण्याकडे मानवाची वाटचाल होते. वरील प्रकारचा बीभत्स आणि अश्लील योगाभ्यास हा लोकांच्या भावना चाळवण्यासाठी प्रसारित केला जात आहे कि काय ? असेच वाटते. यामुळे योगपरंपरेचा अवमान झाला असून योगाभ्यासवर्ग घेणार्‍या शिक्षकांनी यावर संघटितपणे आवाज उठवायला हवा. सोहेल हा योगाभ्यासाला जगात कलंकित करत आहे. इस्लाममध्ये सूर्यनमस्कार, योगा, पूजा यांना मान्यता नाही; मात्र बीभत्स प्रकारे योग शिकवणे कसे चालत आहे ? सोहेलचे १ लाख ४२ सहस्र अनुयायी आहेत. या मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या बुद्धीला कसले ग्रहण लागले आहे ? यांपैकी कुणीच ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाचत नाहीत का ? स्त्रीस्वातंत्र्याच्या नावाखाली मुलींना कितपत स्वातंत्र्य द्यायचे ? ‘हिंदु मुलींना हवे तसे स्पर्श करून त्यावर हा सोहेल पैसे कमवत आहे’, हे त्या मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या लक्षात कसे येत नाही ? तो स्वधर्मातील मुलींना यासाठी का घेत नाही ? त्यामुळेच थूंक जिहाद’, ‘जिम (व्यायाम) जिहाद’ याप्रमाणेच हा ‘योग जिहाद’ तर नाही ना ? अशी शंका येते. यातून मुली लव्ह जिहादमध्ये फसू शकतात, हे वेगळेच. योगपरंपरेचा असा गैरवापर करून तिचा अवमान करणार्‍यांच्या वर्गात कुणीही प्रवेश घ्यायला नको, असे कुणा धर्माभिमान्याला वाटले, तर चूक ते काय ?

– सौ. अपर्णा जगताप, पुणे