Heat Wave Alert : पुढील ३ मास देशातील ८५ टक्के भागात येणार तीव्र उष्णतेची लाट !

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

नवी देहली – भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी ३ मास देशातील ८५ टक्के भागांत तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. वर्ष २०२३ मध्ये हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत होता. ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या उष्णतेच्या लाटेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, २३ राज्ये आणि २०० हून अधिक शहरे यांनी कृती आराखडा सिद्ध केला आहे.

पुढील आठवड्यात तापमान ३ ते ५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक परिणाम एप्रिल मासाच्या अखेरीस राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्रप्रदेशात जाणवणार आहे. ही स्थिती जूनपर्यंत राहू शकते. या काळात उष्णतेची लाट लागोपाठ २० दिवस राहू शकते.