बालोद (छत्तीसगड) – येथील जामडी पाटेश्वर धामच्या मंदिरात पशूंची हत्या करून त्यांचे मांस आणि रक्त मूर्तीवर टाकण्यात आल्याच्या प्रकरणी गेल्या एक मासात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत श्री राम बालक दासजी महाराज यांचा एका व्यक्तीने अवमान करणे, महाराजांच्या भक्तांना घाबरवणे, श्री हनुमानाची मूर्ती फोडणे आदी प्रकार केले. याविरोधात रायपूरच्या शदाणी दरबार येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विविध आखाड्यांचे प्रमुख, सामाजिक संघटनांचे प्रमुख आदी सहभागी झाले होते. या बैठकीत ७ जून या दिवशी साधू-संतांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचे निश्चित ठरवण्यात आले. या बैठकीत संत श्री युधिष्ठिर लाल शदाणी, महंत सर्वेश्वर दास, महंत त्रिवेणी दास, महंत श्री राम बालक दासजी महाराज आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|