जर्मनी युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवणार !

जर्मनीचे चान्सलर ओलाफ शॉल्त्स

बर्लिन – जर्मनी युक्रेनला साहाय्य करण्यासाठी १ सहस्र रणगाडाविरोधी शस्त्रे, तसेच ५०० ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्रे पाठवणार आहे. ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्रे ही भूमीवरील वाहने किंवा हेलिकॉप्टर यांवरून सोडली जाऊ शकतात. जर्मनीचे चान्सलर ओलाफ शॉल्त्स म्हणाले, ‘‘रशियाच्या आक्रमक सेनेच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनला साहाय्य करणे, हे आमचे दायित्व आहे.’’