मंदिरांमध्ये ‘पास’ देऊन दर्शन घडवण्याचा भेदभाव कशासाठी ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

‘अनेक मंदिरांमध्ये सध्या दर्शनासाठी पैसे देऊन ‘व्हीआयपी पास’ दिला जातो. अशांचे देवदर्शन लवकर घडवून आणले जाते. वास्तविक देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडे देव समान दृष्टीनेच पहातो. असे असतांना मंदिरांमध्ये ‘पास’ देऊन दर्शन घडवण्याचा भेदभाव कशासाठी ?’


मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! – सौ. शिल्पा नायर, अध्यक्षा, ‘पीपल फॉर धर्म’ संस्था, केरळ

मंदिरांमधून कला आणि संस्कृती यांचा पुरस्कार केला जात असे; पण सध्या ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्थेत मंदिरांच्या धनावर डोळा ठेवून ती कह्यात घेतली जात आहेत. हा एक प्रकारचा सांस्कृतिक वंशविच्छेद आहे. भारताला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर मंदिरे भक्तांकडे सोपवली पाहिजेत.