गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून १८ वाहनांची जाळपोळ !

  • नक्षलवाद संपूर्ण नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी ! – संपादक 
  • कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश ! – संपादक 

गडचिरोली – जिल्ह्यातील विकासकामांना नक्षलवाद्यांकडून विरोध केला जात आहे. जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील इरपणार गावाजवळ रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या १८ वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ करण्यात आली. यात १५ ट्रॅक्टर, २ जेसीबी आणि एक मातीचा रस्ता सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रेडरगाडी यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत दोडराज-इर्फणार-नेलगुंडा गावांना जोडणार्‍या ६ कि.मी. रस्त्याचे काम चालू होते. यासाठी ही सर्व वाहने काम करत होती. त्या वेळीच नक्षलवाद्यांनी काम थांबवून वाहनांची जाळपोळ चालू केली, तसेच त्यांनी या भागात चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा विरोध केला. जाळलेल्या वाहनांमध्ये काही वाहने कंत्राटदारांची, तर काही वाहने स्थानिक परिसरातील लोकांची होती.