एका प्रसंगात साधिकेला सुचलेले देवाने काव्यरूपात दिलेले आशीर्वचन आणि त्यानंतर तिने देवाला काव्यरूपात केलेली याचना !

‘एका प्रसंगात मला फार भीती वाटली. ‘भीती न्यून होऊन शिकता येऊ दे’, अशी देवाला प्रार्थना करतांना देवाने मला पुढील काव्य सुचवले.

कु. निकिता झरकर

१. भिऊ नकोस निकिता, शिकत रहा सतत ।
भिऊ नकोस निकिता, शिकत रहा सतत ।
अखंड प्रयत्न होण्यासाठी झटत रहा सतत ।। १ ।।

श्रद्धा ठेव गुरूंवर, सोडणार नाहीत ते अर्ध्या वाटेवर ।
वाट चुकलीस, तरी आणतील मार्गावर ।
शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जातील, तुला ते सत्वर ।। २ ।।

केवळ श्रद्धा ठेव । केवळ श्रद्धा ठेव ।। ३ ।।

२. भगवंता, शेवटपर्यंत तुझे बोट नाही रे सोडणार ।
वरील काव्य स्फुरल्यानंतर आतून आपोआप आलेले उत्तर पुढे दिले आहे.

देवा तुझे बोल अखंड स्मरणात रहावे । तुझ्या संकल्पास पात्र मी व्हावे ।। १ ।।

श्रद्धा ठेवीन अखंड माझ्या देवावर । भगवंता, शेवटपर्यंत तुझे बोट नाही रे सोडणार ।। २ ।।

– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.२.२०१४)


या  कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक