घरी जाऊन कोरोनावरील लस देण्याची सिद्धता असेल, तर लसीकरणाला अनुमती देऊ !

मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आवाहन

मुंबई – लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनावरील लस घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, अंथरूणाला खिळलेले रुग्णाईत यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येऊ शकत नाही. अशा व्यक्तींना घरी जाऊन लस द्यावी.

मुंबई महानगरपालिकेची तशी सिद्धता असेल, तर आम्ही त्याला अनुमती देऊ, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी केंद्रशासनाच्या आदेशाची वाट पहाण्याची आवश्यकता नाही. याविषयी मुंबई महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.