दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना विनंती !

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन वितरणाच्या अडचणींमुळे १७ एप्रिलपासून अनिश्‍चित कालावधीसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथील छपाई होऊ शकणार नाही. वाचकांच्या होणार्‍या गैरसोयीविषयी आम्ही दिलगीर आहोत. वाचकांचे असेच सहकार्य आणि प्रेम आम्हाला लाभावे, ही विनंती !

– संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह