धरणे बांधणे यांसारखे केवळ वरवरचे उपाय करणारे शासनकर्ते नकोत !

‘नुसती धरणे बांधून दुष्काळाला तोंड देता येईल का ? धरणे बांधली; पण पाऊसच आला नाही, तर धरणांचा काय उपयोग ? ‘अमुक इतके दुष्काळामुळे मेले’, अशा बातम्या छापत रहाणार का ? असे होऊ नये म्हणून जनतेला साधनेची गोडी लावावी. जनतेने साधना केल्यामुळे अवर्षण किंवा पूर कधीच येणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मातील ज्ञानाचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हल्लीच्या महिलांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची दैनावस्था होण्यामागील एक कारण !

‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर धर्मांत असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना हे लांच्छनास्पदच !

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजहित आणि राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे हे कसे समजत नाही ? उद्या त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी करणार्‍यांना पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारण आणि साधना

‘हल्लीचे राजकारण रसातळाला नेते, तर साधना देवाकडे नेते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?

‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हल्लीच्या काळात ‘जशी प्रजा, तसा राजा’ !

‘यथा राजा तथा प्रजा ।, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा’, उदा. रामराज्यात रामाप्रमाणे सर्व प्रजा सात्त्विक होती. आता ‘यथा प्रजा तथा राजा ।’, म्हणजे ‘जशी प्रजा, तसा राजा’, अशी स्थिती झाली आहे, म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या प्रजेने निवडून दिलेले शासनकर्ते तसेच आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले