नवी मुंबईतील ४१ अनधिकृत हॉटेल, बार, पबवर धडक कारवाई !

नवी मुंबई – अनधिकृत बांधकाम असलेली ४१ उपाहारगृहे, बार अँड रेस्टॉरंट, लेडीज बार, पब, लॉज, हुक्का पार्लर यांवर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कारवाई केली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

जे हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, तसेच अतिरिक्त जागेचा गैरवापर केला आहे, त्यांच्यावर यापुढील काळातही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. राहुल गेठे यांनी दिली.

संपादकीय भूमिका

इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असतांना प्रशासन काय झोपा काढत होते का ? अशा संबंधित निष्क्रीय अधिकार्‍यांवरही कारवाई करायला हवी !