प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘भोसले स्मृती’ सन्मान घोषित !

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

पुणे – प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती’ सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ‘स्वरानंद प्रतिष्ठान’चे श्री. प्रकाश भोंडे यांचाही विशेष सन्मान होणार आहे, अशी घोषणा समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केली. प्राचार्य भोसले यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त १५ जुलै या दिवशी एस्.एम्. जोशी सभागृहात कार्यक्रम होईल. कीर्तनकार आफळे यांनी त्यांच्या कीर्तन आणि व्याख्यानातून विचार जागराच्या दिलेल्या योगदानासाठी त्यांचा सन्मान होणार आहे, तर भोंडे यांनी ५ दशकाहून अधिक काळ दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रवण संस्कृती समृद्ध केल्याने त्यांचाही विशेष सन्मान होईल, अशी माहिती प्रा. जोशी यांनी दिली.