ढाका (बांगलादेश) – भारताने बांगलादेशाच्या सीमेवरील ठाकूरगावच्या राणीशंकोई उपजिल्हामधील ५६.८६ एकर भूमी बांगलादेशला दिली आहे. त्या बदल्यात भारताला बांगलादेशकडून १४.६८ एकर भूमी मिळाली आहे. भारताकडून सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशकडून बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात ध्वज बैठकीत भूमींची देवाणघेवाण झाली. वर्ष १९७४ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात भूमीच्या देवाणघेवाणीचा करार झाला होता; मात्र राणीशंकोईबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. भारताने दिलेल्या भूमीपैकी ४८.१२ एकर शेती, ६.८७ एकर चहाच्या मळ्याखाली आणि १.८७ एकर भूमी लागवडीखाली आहे.