‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत इतकी वर्षे का पालट केले नाहीत ?

‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद म्हणजे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी श्रीराममंदिर आंदोलन सविस्तरपणे शिकवले जाणार आहे, तसेच ११ वीच्या पुस्तकात ८ व्या धड्यामध्ये ‘वर्ष २००२ च्या गोध्रा दंगलीत १ सहस्रांहून अधिक नागरिक, प्रामुख्याने मुसलमान मारले गेले’, या उल्लेखात ‘या दंगलींमध्ये १ सहस्रांहून अधिक नागरिक मारले गेले’, असा पालट करण्यात आला आहे. ‘पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ असे संबोधतो’, असे या पुस्तकात म्हटले होते. त्यात पालट करून आता ‘हा भारतीय भूभाग पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला असून त्याला पाकव्याप्त जम्मू-काश्मीर असे नाव दिले आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.’ (७.४.२०२४)