अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक सुविचार

कोटी कोटी प्रणाम !

आज श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…

श्री स्वामी समर्थ

१. अपेक्षाविरहित कर्माने उत्तम फळ मिळते.

२. हे शरीर सुद्धा आपले नाही. ते ईश्वराने दिले आहे. मग गर्व कशाला ?

३. इच्छा, अपेक्षा, आशा यांतच दु:खाचे मूळ कारण आहे.

४. सद्भावना, सद्बुद्धी, सद्विचार हीच मानवाची खरी संपत्ती आहे.

५. कुणाला वाईट बोलून त्याचे पाप आपल्या माथी धारण करू नये.

६. ‘जसे कर्म तसे फळ,’ हा ईश्वराचा नियम आहे.

७. मद, मोह, मत्सर, राग, लोभ हे मानवाचे खरे शत्रू आहेत.

८. अहंकाराचा त्याग केल्यावरच मानवाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल.