स्पॅनिश महिलेवर भारतात झालेल्या अत्याचाराला प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेली अवास्तव प्रसिद्धी हे एक षड्यंत्र

मार्च २०२४ च्या पहिल्या आठवड्यात भारतावर सर्व बाजूंनी विशेषतः हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. असे काय घडले होते ? यासंबंधी बातम्यांच्या माध्यमातून मी गोळा केलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे. झारखंडमध्ये रांचीपासून ३०० किलोमीटर अंतरावर दुमका या ठिकाणी एक २८ वर्षीय स्पॅनिश महिला आणि तिचा ६४ वर्षे वयाचा पती यांनी तंबू घातला होता. ते काही वर्षे जगभर प्रवास करून बांगलादेशमधून २ मोटरसायकलवरून आले होते.

१ मार्च २०२४ या दिवशी रात्री ११ वाजता गस्त घालणार्‍या एका पोलिसाने त्यांना रस्त्याच्या बाजूला पाहिले. भाषा समजण्याची अडचण असल्याने ते काय सांगतात ? ते पोलिसाला कळत नव्हते. त्या पोलिसाने त्यांना तेथून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात नेले. ‘द वीक’ या वृत्तपत्राने लिहिले आहे, ‘ते दोघेही त्यांची दुचाकी घेऊन ६० किलोमीटर अंतर जाण्याच्या स्थितीत होते आणि त्यांच्यासोबत पोलीस गेले. रुग्णालयात गेल्यावर त्या महिलेने ‘तिच्यावर ७ ते ८ लोकांनी सामूहिक बलात्कार केला’, असे डॉक्टरांना सांगितले.’

तिने सांगितले की, या ७ ते ८ लोकांनी तिच्या नवर्‍याला बांधून ठेवले आणि तिच्यावर एका मागून एक याप्रमाणे बलात्कार केला. त्याखेरीज या संशयितांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्यामध्ये एक हिर्‍याची अंगठी होती ती त्यांनी चोरून नेली; परंतु तिच्या म्हणण्यानुसार या सर्वांचा मूळ हेतू बलात्कार करणे, हाच होता. ही घटना सायंकाळी ७.३० ते रात्री १० या वेळेमध्ये घडली आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पोचले. तिने तिचे म्हणणे पोलिसांना रुग्णालयात सांगितले आणि त्यासंबंधी चित्रफीत ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरून प्रसारित केली. नंतर तिने ही चित्रफीत हटवली. २ मार्च या दिवशी त्या महिलेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संशयितांची चौकशी करण्यास प्रारंभ केला. त्यापैकी काही जणांना २ मार्च या दिवशीच पोलिसांनी कह्यात घेतले. त्यांनी इतरांची नावे सांगितली आणि त्यानंतर लगेचच या सर्व ८ जणांना अटक करण्यात आली.

१. स्थानिक न्यायालयाने स्वतःहून याचिका करणे आणि त्या जोडप्याला पूर्ण सुरक्षेत नेपाळला पाठवणे

‘हिंदू’ या वृत्तपत्रातील वृत्तानुसार स्थानिक न्यायालयाने ‘त्स्यु मोटो’ याचिकेद्वारे (स्वतःहून नोंद घेऊन प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका) लगेच या घटनेची नोंद घेतली; कारण या घटनेचा भारताच्या प्रतिमेवर परिणाम झाला असता. एक महिला न्यायाधीश या स्पॅनिश महिलेला भेटली. त्यानंतर ‘ती स्पॅनिश तरुणी मनाने खचली होती; परंतु तिची शारीरिक स्थिती चांगली होती’, असा निष्कर्ष त्या महिला न्यायाधीशाने काढला.

५ मार्च या दिवशी त्या दोघांना १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात येऊन ते नेपाळला गेले. ही घटना घडली ते दुमका गाव असलेल्या भागाचे प्रतिनिधीत्व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले होते. त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याविषयी झारखंड सरकारवर टीका केली.

२. भारत अन् हिंदु संस्कृती यांवर आरोप करण्यासाठी देशविरोधकांची प्रणाली कार्यरत झाल्याची शक्यता

प्रतिकात्मक छायाचित्र

मी जेव्हा चित्रफितीसह केलेले ‘ट्वीट’ पाहिले. या चित्रफितीमध्ये स्पॅनिश महिला ‘आपण या परिस्थितीचा कसा सामना केला ?’, याविषयी बोलत होती. ही चित्रफीत एका तुर्की महिलेने प्रसारित केली होती. या चित्रफितीला ४९ दशलक्ष प्रतिक्रिया आल्या, हे खरोखरच आश्चर्यजनक वाटते आणि त्याविषयी संशय निर्माण होतो. मी अपेक्षा केल्याप्रमाणेच घडले होते की, अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुणीही व्यक्ती मुसलमान नव्हती. यावरून ‘भारताची अपकीर्ती करण्यासाठी वर्ष २०१२ मधील ‘निर्भया’ प्रकरणात केल्याप्रमाणे ‘टूल कीट’ (देशविरोधकांची प्रणाली) कार्यरत करण्यात आले आहे’, असे वाटत होते. त्या वेळी आगीच्या वणव्याप्रमाणे ते वृत्त जगभर पसरले होते आणि वैयक्तिक संशयितांपेक्षा भारत अन् हिंदु संस्कृती यांवर आरोप झाले. त्या वेळी भारताची पाकिस्तानशी बरोबरी करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे; कारण काही मासांपूर्वी रॉदेरहम या ठिकाणी पाकिस्तानी मुसलमानांनी बलात्कार केला होता. त्या वेळी भारताच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. पश्चिमेकडील देशातील बहुतांश जणांना ज्यांना भारताविषयी काही अनुभव नाही, त्यांनी ‘भारतात बलात्कार ही मोठी समस्या आहे’, असा समज करून घेतला. सध्याचे दुमका येथील प्रकरणही आगीप्रमाणे सर्वत्र पसरले. तुर्की महिलेने केलेल्या ‘ट्वीट’ला १० दिवसांत २१० दशलक्ष प्रतिक्रिया मिळाल्या. प्रत्यक्षातील माहितीमध्ये पालट केल्याविना हे केवळ अशक्य आहे. हे प्रकरण केवळ सामाजिक माध्यमांवर गेले नाही, तर प्रसिद्धीमाध्यमांतील मुख्य प्रवाहामध्ये त्याला प्रसिद्धी देण्यात आली. ही भयानक घटना परत एकदा भारतात घडली, असे सांगताना वृत्तपत्रांनी ‘कथित माहितीनुसार’ असे प्रसिद्ध केले नाही.

मारिया वर्थ

३. स्पॅनिश महिलेवरील अत्याचार्‍याच्या घटनेवर उपस्थित होणार्‍या शंका

स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झालाही असेल; परंतु आताच्या काळात ती घटना खरच झाली आहे, याची खात्री नसते. जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत पुरुष किंवा महिला कुणाचेही म्हणणे सत्य आहे, असे ग्राह्य धरू नये; कारण भारतात खोट्या पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. ‘या प्रकरणात अधिक भर घालू नये’, असे मी ‘ट्वीट’ केल्यावर माझ्यावर वैयक्तिकपणे अपमानकारक टीका झाली. मी या प्रकरणात काही गोष्टींविषयी सूत्रे मांडली आहेत. ती सूत्रे पुढीलप्रमाणे :

अ. ७ किंवा ८ जणांनी एवढ्या अमानुषपणे बलात्कार केल्यानंतर एका घंट्याने ती महिला आणि तिचा पती स्वतः दुचाकी घेऊन ६० किलोमीटर अंतरावर जाण्याच्या स्थितीत होते का ?

आ. यातील दुसरी त्रुटी, म्हणजे त्यांना धनादेश मिळाला. त्यानंतर नेपाळला जाण्यापूर्वी ते पोलिसांशी सौजन्याने वागत होते का ? कारण त्यांनी पोलिसांसमवेत ‘सेल्फी’ (स्वतःचे) छायाचित्र काढले. ‘ट्वीट’ केलेल्या छायाचित्रामध्ये त्या महिलेच्या चेहर्‍यावरील ओरबाडल्याच्या खुणा गायब झाल्या होत्या.

इ. अजून एक त्रुटी म्हणजे ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) हे सामाजिक माध्यम वापरणार्‍या एकाने या महिलेने १८ जानेवारी या दिवशी प्रसारित केलेली ध्वनीचित्रफीत शोधून काढली. या ध्वनीचित्रफितीमध्ये त्या दोघांनी ४ मासांनी सांगितले, ‘पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर त्यांनी १४ सहस्र ५०० किलोमीटरचा प्रवास केला. ते कन्याकुमारी येथे पोचले आहेत आणि ते ऑस्ट्रेलियाला जातील.’ हे त्यांचे नियोजन पालटून आणि इतक्या जलद ते उत्तर भारतात परत कसे आले ? असा प्रश्न निर्माण होतो.

मला अशी काळजी वाटते की, काही स्थानिक लोकांना मारहाण करून जे सत्य नाही, अशाविषयी त्यांनी संमती (स्वीकृती) देण्यास भाग पाडले असावे. दुर्दैवाने असे घडू शकते; कारण कठुआ येथील प्रकरणामध्ये तसे घडले होते. ‘द गर्ल फ्रॉम कठुआ’ या संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकात मधुपूर्णिमा किश्वर यांनी दुःखदायक घटनेविषयी बहुमूल्य माहिती दिली होती. ती वाचून मला धक्काच बसला होता.

४. भारतात गुन्ह्यांचे वाढते प्रमाण हे त्याच्या विरोधातील एक षड्यंत्र !

या स्पॅनिश जोडप्याने प्रसिद्ध केलेल्या ‘पोस्ट’वरून (लिखाणावरून) दोन गोष्टी लक्षात येतात. पहिले म्हणजे मुख्य प्रवाहातील सामाजिक माध्यमांनी ‘गुन्हेगार हिंदु आहेत’, असे निश्चित झाले नव्हते, तरी भारतियांवर म्हणजे हिंदु संस्कृतीवर जोरदार टीका केली. दुसरीकडे अनेक हिंदूंना याविषयी लाज वाटली आणि त्यांनी या घटनेविषयी क्षमा व्यक्त केली. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने ‘अशी घटना घडली, त्याविषयी सर्व भारतियांना लाज वाटली पाहिजे’, असा मथळा दिला होता. पण असे का ? जेव्हा एखादा जर्मन असा गुन्हा करतो, तेव्हा त्याचा दोष मी माझ्यावर घेत नाही किंवा ख्रिस्ती किंवा जर्मन संस्कृती यांना दोष दिला जात नाही; परंतु तुलनेत भारतात असे गुन्हे घडण्याचे प्रमाण अल्प असूनही हिंदु त्याविषयी स्वतःला दोषी समजतात.

यामुळे इतरांना त्यांच्या अधिक प्रमाणात आक्रमण करता येईल, हे त्यांना समजत नाही. उदाहरणार्थ डॅनियल हॅकिकटज्यू यांनी ट्वीट केले आहे, ‘‘देवतांची पूजा करणार्‍या या धर्मातील वा पुराणातील कथांमध्ये व्यभिचार आणि लैंगिक अत्याचार आहेत, अशा धर्मावर हा समाज आधारीत आहे, असे वाटते.’’ याला माझे उत्तर आहे, ‘‘हिंदु धर्मावर आधारीत समाज कसा आहे ? हे अब्राम्हिक (एकेश्वरवादी) धर्मावर आधारीत समाजाशी तुलना करून शोधून काढले पाहिजे. यासाठी घडणारे गुन्हे आणि गुन्हेगारांचा धर्म यांच्याविषयी माहिती गोळा केली पाहिजे. माझा अंदाज असा आहे की, हिंदु समाजामध्ये सर्वांत अल्प प्रमाणात गुन्हे घडत असतात आणि हे लोकांना अन् तुम्हालाही ठाऊक असते. तुलनात्मक दृष्टीने भारतात गुन्ह्यांचे प्रमाण अल्प आहे. तरीही भारतातील मोठ्या लोकसंख्येचा लाभ घेऊन ते लोकांना गोंधळात टाकतात. उदाहरणार्थ ‘बिझनेस स्टँडर्ड’ हे वृत्तपत्र बलात्कार घडण्याच्या प्रमाणाविषयी लिहिते, ‘वर्ष २०२० च्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये बलात्काराच्या घटना घडण्याचे प्रमाण प्रती लाख नागरिकांमध्ये २२ सहस्र १७२ आहे. त्यामुळे त्याची टक्केवारी २२.१७ आहे, म्हणजे प्रतिदिन बलात्काराच्या ८७ घटना घडतात.’ स्विडनविषयी ते म्हणतात, ‘स्वीडनमधील बलात्कार होण्याचे प्रमाण ५.९६ टक्के आहे. १ लाख लोकांमध्ये ५ सहस्र ९६० इतके प्रमाण आहे.’

सर्वसाधारणपणे वाचणार्‍याला वरकरणी कोणता देश वाईट आहे ? असे वाटत असेल, तर कदाचित् भारत देश असेल; परंतु याचे विश्लेषण केले, तर भारतातील १३० कोटी लोकसंख्येची तुलना स्वीडनमधील १ कोटी लोकसंख्येशी केली, तर भारतातील प्रमाण १३० कोटींमध्ये ७ लाख ८० सहस्र होते, म्हणजे १३० कोटी लोकसंख्या लक्षात घेता भारतात बलात्काराचे प्रमाण अल्प आहे. अनेक पाश्चिमात्य म्हणतील, ‘मी भारतातील संख्येवर विश्वास ठेवत नाही’, याला कोण काय करणार ?

५. हिंदु धर्मविरोधक वास्तव का जाणून घेत नाहीत ?

हिंदु धर्मावर आधारीत लोकांची मानसिकता लक्षात घेतली, तर त्या धर्मामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अल्प आहे. हे कळण्यासाठी हिंदु धर्म म्हणजे काय ? हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, ज्यांचे सामाजिक माध्यमांमध्ये नाव आहे, अशी पाश्चिमात्य समाजातील मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे भारताला नेहमी खाली दाखवण्याचा का प्रयत्न करत आहेत ? ते योग्य आणि वास्तव का जाणून घेत नाहीत ? विन्सटन चर्चिल यांनी दावा केल्याप्रमाणे ‘हिंदु धर्म हा क्रूर आहे’, असे मानणारे एक तर सर्वजण खरोखरच अज्ञानी आहेत किंवा त्यांना सत्य ठाऊक आहे.’ हिंदु धर्म इतर धर्मांचा धंदा बंद करील, अशी त्यांना भीती वाटते का ? यावर कसून संशोधन व्हायला हवे.

लेखिका : मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक, जर्मनी.

संपादकीय भूमिका

भारताच्या विरोधात रचले जाणारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !