काबुलमध्ये चिनी नागरिकांचा वावर असणार्‍या हॉटेलवर आक्रमण

काबुल (अफगाणिस्तान) – येथील ‘स्टार-ए-नौ’ या हॉटेलवर अज्ञातांनी आक्रमण केले. येथे प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

या हॉटेलला ‘चायनीज हॉटेल’ असेही म्हटले जाते. येथे मोठ्या प्रमाणात चिनी नागरिक येत असतात. अद्याप या आक्रमणाविषयी विस्तृत माहिती समोर आलेली नाही.