पिंपरी (पुणे), २७ ऑगस्ट – शाळेचे शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी करत शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेले पालक आणि अन्य व्यक्ती यांनी त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कूलमधील तांत्रिक सल्लागार (आयटी कन्सल्टंट) स्टॅफिन चेरुवतुर यांना २३ ऑगस्ट या दिवशी मारहाण केली, तसेच याचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल करून त्यांची अपकीर्ती केली. या प्रकरणी स्टॅफिन यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.