साधक असे अपूर्ण, गुरु माझा तो पूर्णब्रह्म ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांचा भाव जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीमती भाग्यश्री आणेकर

गुरुदेवा, शब्दब्रह्म ते अपुरे, तुझे वर्णन करावया ।
कोणती वाणी आणू, तुझे वर्णन करावया ।
कशी होऊ उतराई ॥ १ ॥

भुंगा फिरला कमळाभोवती, तशी झाली रे माझी अवस्था ।
माझ्या मनाला नाही कळत, समजून घे तू नारायणा ॥ २ ॥

रामनाथीच्या माझ्या रामा (टीप १), कशी सांगू मी माझी व्यथा ।
माझे मन भरूनी येते अन् नेत्रांतूनी वाहती गंगाधारा ॥ ३ ॥

ज्ञानाच्या सागरात सार्‍यांची डुंबली काया ।
द्वापरयुगाची द्वारका अन् अनुभवली मी कृष्णछाया ॥ ४ ॥

‘रामनाथी’ या शब्दात सारा अर्थ गं गवसला ।
रामाचे सारे तत्त्व देऊ केले सनातनला ॥ ५ ॥

रामाच्या दरबारी विष्णुतत्त्व कार्यरत ।
आनंदी तुझी वानरसेना यात लीला लपवीत ॥ ६ ॥

आगळे-वेगळे रूप, कुणास नाही कळत ।
हृदयकोशात लपूनी, तू कार्य करत जातो पुढे ॥ ७ ॥

साधक असे अपूर्ण, गुरु माझा तो पूर्णब्रह्म ।
कशी होऊ उतराई, शब्दब्रह्म ते अपुरे ॥ ८ ॥

ना मै कर्ता हरिही कर्ता ।
हरि कर्ता केवलं श्रीहरि ॥ ९ ॥

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी, उत्तरप्रदेश. (२७.११.२०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक