बाह्य गोष्टींवर अवलंबून न रहाता सतत देवाच्या स्मरणात रमणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले ७८ वर्षीय श्री. हनुमंत शिंदे !

श्री. हनुमंत शिंदे

(हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे वडील)

​‘साधारण २ – ३ वर्षांपूर्वी पनवेल येथील श्री. हनुमंत शिंदे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात आले होते. एकदा काकांना भोजनाच्या वेळी पुष्कळ उकाडा असल्याने घाम आला होता; परंतु ते भोजन करण्यासाठी तेथे चालू असलेल्या पंख्याखाली न बसता अन्य ठिकाणी बसले होते. हे पाहून मी काकांना विचारले, ‘‘तुम्हाला गरम होत आहे, तर पंखा नको का ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मी बाराही मास पंख्याचा वापर करत नाही.’’ त्याचे कारण मी आश्‍चर्याने काकांना विचारले, तेव्हा काका हसून म्हणाले, ‘‘माझ्या हृदयात सतत देवाचे स्मरण चालू असते. त्यातून चैतन्याचा गारवा मला नेहमी मिळत असतो. त्यामुळे मला कधीही पंख्याची आवश्यकता भासत नाही.’’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२०)