विज्ञान सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल !

‘विज्ञान हे अध्यात्मशास्त्राचे एक भरकटलेले पिल्लू आहे. आज ना उद्या ते सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल आणि त्याच्याशी एकरूप होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मृत्यूची भीती घालवणारे म्हातारपण !

‘आयुष्यात आलेल्या अनेक कटू अनुभवांनंतर किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे म्हातारपणी मनुष्याला जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. त्याला जीवन सोडून द्यावेसे वाटते. आयुष्यभर ज्या मृत्यूची भीती वाटत असते, ती जाऊन ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटू लागते.’

हिंदूंची नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल !

‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. एवढेच नव्हे, तर ‘सर्वधर्मसमभाव’, असा अत्यंत चुकीचा शब्द शिकवला जातो, जो इतर एकही धर्म शिकवत नाही. त्यामुळे हिंदूंची नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हल्लीचे स्वार्थी राजकारणी !

‘राजकारणी’ शब्दाचा अर्थ आहे ‘मुत्सद्दी’; पण कलियुगातील हल्लीचे राजकारणी राष्ट्र किंवा धर्म यांच्यासाठी मुत्सद्देगिरी न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कर्मकांडाचे महत्त्व !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ !

‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग !

‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्म विसरल्याने भारतातील विविध भागांतील हिंदूंना एकमेकांविषयी जवळीक वाटत नाही !

‘भारतातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तीभाव नसलेल्यांकडे मंदिरांचे उत्तरदायित्व देणे, हा धर्मद्रोह !

मंदिराचे व्यवस्थापन सांभाळायला भक्तीभाव नसलेल्यांकडे सरकार मंदिरांचे उत्तरदायित्व देते. त्यामुळे मंदिरांत भ्रष्टाचार होतो आणि मंदिरांची सात्त्विकताही नष्ट होत आली आहे ! हिंदु राष्ट्रात चांगल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले