‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा दिवस !

‘हिंदु राष्ट्रातील नागरिक हिंदु राष्ट्र स्थापनेचा दिवस सुटी घेऊन साजरा करणार नाहीत, तर देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्साहाने कामावर जातील.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हल्लीच्या पालकांना ‘आमचा मुलगा इंग्लीश बोलतो’, याचा अभिमान असतो, तर साधकांना ‘आमचा मुलगा दैवी बालक आहे’, यामुळे कृतज्ञता वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ऋषीमुनींचे महत्त्व !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’

‘संत’ ही जगातील सर्वोच्च पदवी !

‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

आपत्काळात वाचण्यासाठी साधना करा !

भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव  आपत्काळात वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले