भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तळहातांचे आध्यात्मिक महत्त्व

‘तळहातांना वायुतत्त्वाच्या स्तरावरील स्पंदने जाणवतात. त्यामुळे कोणतीही वस्तू, व्यक्ती यांची स्पंदने तळहातांच्या आधारे लगेच ओळखता येतात. हस्तांदोलन करतांना मात्र सूक्ष्मातील कळत नाही !’

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन

‘ज्या वेळी एखादा मंत्री भ्रष्टाचारी असतो, तेव्हा त्याला साहाय्य करणारे त्याचे स्वीय साहाय्यक हेही भ्रष्टाचारीच ठरतात; कारण बहुदा तेच त्यांना सर्व स्तरांवर साहाय्य करत असतात !’

ऋषीमुनींचे महत्त्व !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’

‘संत’ ही जगातील सर्वोच्च पदवी !

‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

‘काही लोक थोडे फार अर्पण केल्यावर मोठा गवगवा करतात. खरे तर ईश्वराला सर्वस्वाचे, म्हणजेच तन, मन आणि धन यांचे दान देणे अपेक्षित असते; पण हे मात्र कुणी देत नाही, तर खरे साधकच देतात.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतो; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

‘वय झाल्यावर शारीरिक सुखाची आवड गेली की, बर्‍याच सुखांची ओढ नाहीशी होते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

इतर विषयांवरील लिखाणापेक्षा आध्यात्मिक विषयांवरील लिखाण महत्त्वाचे !

. . . याउलट गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत यांसारखे ग्रंथ अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. काही शतकांनंतर आजही त्यांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ अध्यात्माशी संबंधित, म्हणजे सत्य सांगणारे कार्य, लिखाण हे चिरंतन टिकणारे असते ! – परात्पर गुरु डॉ. आठवले