Vandalise Hanuman idol : रामपूर (उत्तरप्रदेश) येथील रामायण पार्कमधील श्री हनुमानाच्या मूर्तीची मदरशातील मुलांकडून तोडफोड !

रामपूर (उत्तरप्रदेश) – येथील रामायण पार्कमध्ये लावण्यात आलेल्या श्री हनुमानाची मूर्तीची मदरशांतील मुलांनी तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी तेथे मुसलमानाही मोठ्या संख्येन जमा झाल्यावर तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक आमदार आकाश सक्सेना हेही तेथे पोचले. आमदार सक्सेना यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.

१. या घटनेविषयी आमदार आकाश सक्सेना यांनी सांगितले की, रामायण पार्कमधील श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड होण्यास रामपूर विकास प्राधिकरणच उत्तरदायी आहे; कारण ४ वर्षांपूर्वी प्राधिकरणाने हे उद्यान बांधले होते. प्राधिकरणाने या मूर्तीच्या संवर्धनाचीही व्यवस्था करायला हवी होती; पण ती केली नाही. त्यामुळे उपद्रवी घटकांनी ही दुर्दैवी घटना घडवली. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी बोलून मूर्तीच्या संरक्षणासाठी ठोस व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

२. अलीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अतुल श्रीवास्तव म्हणाले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन पहाणी केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका 

  • मदरशांना सरकार शेकडो कोटी रुपयांचे अनुदान देऊन त्यांना पोसून हिंदूंचाच घात करायला लावत आहे, हे लक्षात घ्या !
  • देशातील मदरसे बंद करण्यासाठी आता हिंदूंनी मोठी चळवळ उभारणेच आवश्यक आहे !