सर्वोच्च न्यायालयाने ‘वैद्यकीय कारणां’साठी प्रविष्ट अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली !
नवी देहली – लोकसभा निवडणुकीसाठी देहलीचे मुख्यमंत्री आणि मद्य घोटाळ्यातील आरोपी अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामीनावर बाहेर आहेत. त्यांनी त्यांचा जामीन ७ दिवसांसाठी वाढवण्याची मागणी केली होती; परंतु त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना २ जून या दिवशी देहलीतील तिहार कारागृहात जावेच लागणार आहे.
वैद्यकीय चाचण्यांसाठी मागितला होता जामीन !
अरविंद केजरीवाल यांचे वजन अचानक अल्प होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. मूत्रपिंड खराब होणे, गंभीर हृदयरोग आणि कर्करोग या आजारांचे हे लक्षण असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर ठेवून अन्य वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना ७ दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून हवा होता. यासाठी २ जूनऐवजी ९ जूनला कारागृहात परतण्याची त्यांनी अनुमती त्यांनी मागितली होती; परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे.