इंग्रज प्रवासी विल्यम फिंचच्या आठवणीतील श्रीराममंदिर !

‘वर्ष १६०८ मधील ऑगस्ट मासात विल्यम फिंच हा इंग्रज प्रवासी भारतात आला होता. त्याने अयोध्येला दिलेल्या भेटीविषयी लिहून ठेवले आहे. ‘सहस्रो वर्षांपासून अयोध्यानगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता येथे अवशेष उरले आहेत. ४०० वर्षांपूर्वी बांधलेल्या रामचंद्रांच्या महालाचे आणि त्या वेळच्या घरांचे अवशेषही आहेत. भारतीय या राजाला ‘भगवान’ समजतात. येथे अनेक पुरोहित रहातात. त्यांच्याजवळ येथे येणार्‍या यात्रेकरूंची नोंद आहे. ४ लाख वर्षांपासून शरयू नदीत स्नान करण्यासाठी येथे श्रद्धाळू मोठ्या संख्येने येतात. नदीपासून २ कोस दूर असलेल्या गुंफा चिंचोळ्या आहेत. तिथे श्रीरामांच्या देहाची रक्षा विसर्जित केली आहे, असे समजले जाते.’ विल्यम फिंचने पुढे लिहिले आहे, ‘देशाच्या विविध भागांतून येथे आलेले भक्त आपल्यासमवेत तांदळाचे दाणे प्रसाद रूपात नेतात. व्यापारी दृष्टीनेही अयोध्या समृद्ध आहे. याचाच अर्थ हे एकेकाळी मोठे ठिकाण होते.’ कारसेवकांनी उद्ध्वस्त केलेल्या बाबरी ढाचाचे बांधकाम आणि त्या काळची अन्य बांधकामे यांतील भेद आपल्याला सहज लक्षात येईल. श्रीराममंदिर पाडून मशीद बांधली, हे लक्षात येते. ‘आइन-ए-अकबरी’ या ग्रंथातही भगवान विष्णूच्या १० अवतारांचा उल्लेख असून त्यात ‘प्रभु श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला’, असे लिहिले आहे. विल्यम फिंचच्या लेखनाचा ‘अर्ली ट्रॅव्हल्स टू इंडिया १५८३-१६१९’ या पुस्तकात उल्लेख आहे. विल्यम फिंचचा पुढे बगदाद (इराक) येथे मृत्यू झाला.

साम्यवादी अन् तथाकथित निधर्मी यांनी श्रीराममंदिराचा खोटा इतिहास शिकवणे आणि सर्वाेच्च न्यायालयाने त्यांना फटकारणे

श्रीराममंदिराच्या वतीने बाजू मांडणारे अधिवक्ता सी.एस्. वैद्यनाथन यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचा संदर्भ दिला होता. क्रूर इस्लामी आक्रमक, इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर साम्यवादी अन् तथाकथित निधर्मी यांनी त्यांना हवा तसा इतिहास पालटला. कधी तलवारीच्या, तर कधी लेखणीच्या जोरावर. मंदिराच्या जागी मशीद उभारली आणि खोटा, तसेच चुकीचा इतिहास शिकवला गेला. यातील साम्यवाद्यांना जे, ‘रामायण आणि रामचरितमानस हे खोटे आहे असे म्हणतात’, त्यांना तर सर्वाेच्च न्यायालयानेही फटकारले. ‘आता श्रीराममंदिर उभारले आहे. ते अस्तित्वात होतेच’, याचे दाखलेही आक्रमकांकडूनच समोर येत आहेत.’

(साभार : ‘ऑप इंडिया’, १३ जानेवारी २०२३ आणि ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १६ ते ३१ जानेवारी २०२४)