‘फोन पे’च्या माध्यमातून दुबईमध्ये ऑनलाईन व्यवहार करता येणार !

दुबई (संयुक्त अरब अमिरात) – संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऑनलाईन पैसे देण्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. या संदर्भात ‘फोन पे’ने दुबईची बँक Mashreq समवेत करार केला आहे. यामुळे आता दुबईमध्ये जाणार्‍या भारतियांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी फोन पे अ‍ॅपद्वारे क्युआर कोड स्कॅन करून पैसे देता येणार आहेत.