‘जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनंतनाग येथील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या नियोजनाविषयी चर्चा केली जाणार आहे. ओडिशातील कोणार्क आणि गुजरातमधील मोढेरा यांप्रमाणेच काश्मीरचे मार्तंड सूर्यमंदिर हे भगवान सूर्याला समर्पित भव्य हिंदु मंदिरांपैकी एक आहे.’
(३१.३.२०२४)