सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

आयुर्वेदाची मूलतत्त्वे (वात-पित्त-कफ, प्रकृती आदींचे विवेचन !)

संकलक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले

आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवता येते. आयुर्वेद हे ईश्‍वरनिर्मित शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदाची मूलतत्त्वे शाश्‍वत आणि चिरंतन आहेत. ही मूलतत्त्वे जाणून घेतली, तर या शास्त्राचे अध्ययन करणे, तसेच ते कृतीत आणणे सोपे जाते. या मूलतत्त्वांनुसार दैनंदिन जीवनात सर्वसामान्य व्यक्तीने आचरण ठेवल्यास तिचे जीवन आरोग्यसंपन्न अन् सुखी होण्यास मोठे साहाय्य होते.

विकार आणि उपचार यांविषयी मूलभूत आयुर्वेदीय दृष्टीकोन

आयुर्वेदात एखाद्या रोगावर सर्वच व्यक्तींना एकसारखे उपचार नसतात. व्यक्तीच्या रोगाचे कारण, रुग्णाचे वय, प्रकृती, ती रहात असलेला प्रदेश, रोगाच्या अवस्था इत्यादी घटकांनुसार उपचार पालटतात. विकार आणि उपचार यांविषयीचे मूलभूत आयुर्वेदाचे दृष्टीकोन समजून घेतल्यास प्रत्येक रोगाचे औषध वेगळे लक्षात ठेवावे लागत नाही आणि नवीन निर्माण झालेल्या रोगावर यशस्वीपणे उपचार करणेही सहज शक्य होते.