रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘२३.१२.२०२० या दिवशी मी रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. रंजना गडेकर

१. ‘देवीच्या डोळ्यांतील चकाकी वाढली आहे’, असे जाणवले.

२. देवीचे मुख मारक आणि नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होते, तसेच ‘देवीच्या मुखाकडे पहात रहावे’, असे वाटत होते.

३. देवीच्या मूर्तीकडून तीव्र दैवी सुगंध येत होता. दैवी सुगंध येण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक होते.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी,  गोवा. (२४.१२.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक