कोल्हापूर शहरातील बालकल्याण संकुलातील १८ वर्षांखालील १४ युवती कोरोनाबाधित

१४ युवती कोरोनाबाधित

कोल्हापूर – येथील बालकल्याण संकुलामधील १८ वर्षांखालील १४ युवती ९ मे या दिवशी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. समाजातील अनाथांचे संगोपन या संकुलात केले जाते. या बाधित मुलींना महापालिकेच्या साहाय्याने शिवाजी विद्यापिठातील कोरोना कक्षात उपचांरासाठी भरती करण्यात आले आहे. या मुलींमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नसून त्यांची प्रकृती चांगली आहे. या बालकल्याण संकुलामध्ये २५० मुले आणि मुली रहातात. यात ४६ मुली आहेत. या संकुलामध्ये ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत आणलेल्या मुलींनाही ठेवले जाते.