गुरु तेथे देव ।

साधकांचा भाव जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्रीमती अर्चना मराठे

गुरु तेथे देव, माझे गुरुदेव ।
अनंत रूपे अनंत शक्ती त्यांची अद्वितीय ॥ १ ॥

शब्द, रस, रूप, गंध, शक्ती यांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व ।
चराचरी, स्वर्ग, मृत्यू, पाताळी त्यांचे ममत्व ॥ २ ॥

गुरु तेथे सर्व शक्ती आणि देवतांचे तत्त्व ।
साधकांच्या हृदयी भरली त्याची रूपे आणि अस्तित्व ॥ ३ ॥

गुरुदेव साधकांना भावले तुमचे दैवी कार्य ।
देवानेच केले ते आमच्यासाठी करण्या जगदोद्धार ॥ ४ ॥

गुरुरूपातूनच प्रगटतो देव करण्या भक्तोद्धार ।
साधकांना तारी भाव, साधना आणि तळमळ ॥ ५ ॥

– श्रीमती अर्चना मराठे, बिंबल, वाळपई, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक