केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, यासाठी तरी साधना करा !

‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास चीनला नक्षलवादी आणि साम्यवादी साहाय्य करतील. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास पाकला जिहादी साहाय्य करतील; पण हिंदूंच्या साहाय्याला देव सोडून कोण आहे ? देवाचे साहाय्य मिळवण्यासाठी हिंदूंनो, साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सांप्रतकालीन शालेय शिक्षणाची व्यर्थता !

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा बाकीचा वेळ समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, पारतंत्र्यात ढकलणार्‍या साम्राज्यवाद्यांना पराजित करून भारताला अजेय राष्ट्र बनवण्यासाठी लढाऊ वृत्ती हवी !

अजेय राष्ट्र भारताला बनवण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःमध्ये लढाऊ वृत्ती जागृत करायला हवी ! म्हणून हिंदूंनो, शस्त्रधारी अन् दुष्ट शक्तींसाठी काळ ठरणार्‍या देवतांची उपासना केवळ भजन करून करू नका, तर त्यांच्यातील लढाऊ वृत्तीही अंगी बाणवून भारताला अजेय साम्राज्य बनवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतासाठी ही शोकांतिकाच !

‘बंदुका, दारूगोळा, विमाने इत्यादी सर्व वस्तू आयात करता येतील; पण राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते कुठून आयात करता येतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, कुणाच्या गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा !

‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे मुसलमानांच्या, इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल !

‘भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंताचा भक्त होणेच श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हा देशद्रोहच !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणे, हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा देशद्रोहच नव्हे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले