हिंदूंनो, पारतंत्र्यात ढकलणार्‍या साम्राज्यवाद्यांना पराजित करून भारताला अजेय राष्ट्र बनवण्यासाठी लढाऊ वृत्ती हवी !

अजेय राष्ट्र भारताला बनवण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःमध्ये लढाऊ वृत्ती जागृत करायला हवी ! म्हणून हिंदूंनो, शस्त्रधारी अन् दुष्ट शक्तींसाठी काळ ठरणार्‍या देवतांची उपासना केवळ भजन करून करू नका, तर त्यांच्यातील लढाऊ वृत्तीही अंगी बाणवून भारताला अजेय साम्राज्य बनवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतासाठी ही शोकांतिकाच !

‘बंदुका, दारूगोळा, विमाने इत्यादी सर्व वस्तू आयात करता येतील; पण राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते कुठून आयात करता येतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, कुणाच्या गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा !

‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे मुसलमानांच्या, इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल !

‘भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंताचा भक्त होणेच श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हा देशद्रोहच !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणे, हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा देशद्रोहच नव्हे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतासाठी हे लज्जास्पदच !

‘भारतात अल्पसंख्यांकांवर राज्य करता न येणारे सर्व राजकीय पक्ष कधी मुसलमान बहुसंख्य असलेल्या काश्मीरवर राज्य करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !

‘हनुमंताने व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्‍यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल !

‘विज्ञान हे अध्यात्मशास्त्राचे एक भरकटलेले पिल्लू आहे. आज ना उद्या ते सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल आणि त्याच्याशी एकरूप होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले