अधिक मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करण्यामागील शास्त्र

प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिक मासात सूर्य संक्रात नसते.

अधिक मास आणि सत्कर्मांचा संकल्प

पुरुषोत्तम हे वासुदेवांचे, महाविष्णूंचे नाव आहे. पूर्वी या अधिक मासाला ‘मलमास’ हे नामाविधान होते, मग मलमासाला पुरुषोत्तमाने वरदान दिले की, ‘या मासामध्ये जे जे सत्कर्म घडेल, त्या प्रत्येक सत्कर्माचा प्रचंड गुणाकार होईल आणि ती सगळी सेवा पुरुषोत्तमाकडे रुजू होईल.

यंदाचा अधिक श्रावण मास विशेष महत्त्वाचा ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, विश्व ज्योतिष महासंघ, बिहार

यंदा श्रावण मास हा अधिक मास म्हणून आला आहे आणि याच श्रावण मासापासून साधनेला पूरक अशा पवित्र चातुर्मासाचा प्रारंभही होत आहे. मुळात श्रावण मास हाच पवित्र मास असतो; कारण हा मास देवाधिदेव शिवाशी संबंधित मास आहे.

अधिक मासातील पूजाविधी

अधिक मासात ‘आवळा आणि तीळ यांचे उटणे लावून शरिराचे मर्दन करणे अन् आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे’, हे भगवान श्री पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय आहे, तसेच आरोग्यदायी आणि प्रसन्नता देणारेही आहे.

चातुर्मास्य (चातुर्मास)

‘आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्‍या ४ मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.