Pakistan Budget : पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात हिंदु, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांसाठी तरतूद नाही !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने वर्ष २०२४-२५ या वर्षासाठीच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हिंदु आणि ख्रिस्ती यांसारख्या अल्पसंख्यांकांसाठी कोणतीही कल्याणकारी योजना प्रारंभ केलेली नाही. तसेच एक रुपयाचीही या वेळी तरतूद करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती. या वेळी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न करता मुसलमान कट्टरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यान्वित असलेल्या धार्मिक व्यवहार मंत्रालयासाठी मात्र पैसे वाढवण्यात आले आहेत.

मानवाधिकारासाठीच्या अर्थसंकल्पातही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. २०२४-२५ या वर्षासाठी १० कोटी ४० लाख पाकिस्तानी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षी ही तरतूद ८१ कोटी ४० लाख रुपये इतकी होती.

संपादकीय भूमिका

‘भारतातील मुसलमानांची स्थिती वाईट आहे’, असे जागतिक मंचांवरून अपप्रचार करणार्‍या पाकिस्तानमध्ये हिंदूंसह सर्वच अल्पसंख्यांकांना सरकार भिकार्‍यांपेक्षाही खालच्या दर्जाचे ठरवत आहे. याविषयी भारताने आवाज उठवणे आवश्यक आहे !