परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्म केवळ वाचण्याचे शास्त्र नाही, कृती करण्याचे शास्त्र आहे !     

हिंदुत्वनिष्ठ : मी संकेतस्थळावरील लिखाण वाचत असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : केवळ वाचायचे नाही, तर संकेतस्थळवर जे शिकवले आहे, ते कृतीत आणायचे आहे. अध्यात्म हे केवळ वाचण्याचे शास्त्र नाही. ते कृती करण्याचे शास्त्र आहे !

एकदा येथे आश्रमात एक सत्संग होता. सौ. अंजली मुकुल गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) सत्संग घेत होत्या. त्या सर्व साधकांना म्हणाल्या, ‘‘पुढच्या सप्ताहात आपण ईश्वराप्रती भावजागृतीविषयी बोलू या.’’ जोपर्यंत साधकांमध्ये ईश्वराप्रती भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत काही साध्य होत नाही आणि कलियुगात भावाच्या बळावर आधारित असणारा भक्तीमार्ग अधिक महत्त्वपूर्ण आहे. ज्ञानयोगानुसार साधना करण्याची आपली क्षमता नाही.’’ तेव्हा सौ. अंजली यांनी (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी) सर्वांना सांगितले, ‘‘पुढच्या सप्ताहात सनातन संस्थेचा ‘भावजागृतीसाठी साधना’, हा ग्रंथ वाचून या.’’ पुढच्या सप्ताहात सत्संगाची वेळ झाली. सर्व साधक आले. सौ. अंजलीने त्यांना विचारले, ‘‘ग्रंथ वाचला का ?’’ सर्व साधकांनी हात वर केले.

कु. मधुरा भोसले यांना (कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे) ईश्वरी ज्ञान-प्राप्तकर्त्या साधिकेला) ईश्वराकडून ज्ञान मिळते. सनातनच्या बहुतेक ग्रंथांत तिला प्राप्त झालेले ईश्वरी ज्ञान असते. तिने हात वर केला नव्हता. तेव्हा सौ. अंजलीने विचारले, ‘‘तुझी प्रकृती बरी नव्हती का ? थोडे तरी वाचले असेल ना ?’’ तेव्हा मधुरा म्हणाली, ‘‘मी १० पाने वाचली; पण मी जे वाचले ना, ते मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करत होते.’’

तुम्ही सर्वांनी हे सूत्र लक्षात ठेवा. अध्यात्मासंबंधी लिखाण किंवा ग्रंथ म्हणजे गोष्टीचे पुस्तक आहे का ? जे केवळ वाचले आणि बाजूला ठेवून दिले. ग्रंथ केवळ वाचल्यासारखे करणार नाही, तर त्यातून आपण शिकलो, त्याचे मनन-चिंतन केले आणि शंका विचारून निरसन करून घेतले, तरच साधना होते.

अ. ‘अध्यात्म कृतीचे शास्त्र असल्यामुळे ते दुसर्‍यांना सांगून त्यांना साहाय्य करणे’, ही समष्टी साधनाच आहे !

हिंदुत्वनिष्ठ : मी जीवनात एक गोष्ट शिकलो आहे. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने चालत राहिलो, तर जो किनारा मिळेल, तो योग्यच असणार. तपोवृद्ध आणि परात्पर गुरुदेव यांचे आशीर्वाद आहेत, तर सगळे चांगलेच होईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेत कसे असते, ईश्वराचा आशीर्वाद आधी मिळत नाही. प्रथम आपण साधना करायची असते. ती झाल्यावर आशीर्वाद मागावा लागत नाही. साधना पुष्कळ केली, तर आपोआप आशीर्वाद प्रतिसाद स्वरूपात मिळतोच. (साधना केल्यावर ईश्वराची कृपा आपोआप होते.) हेच समाजाला शिकवायचे आहे. गुरुदेव आहेत. त्यांचा आशीर्वाद घेतला, तर साधना होईल; पण असा आशीर्वाद मिळतो का ? वास्तवात संतांच्या हातातसुद्धा काही नसते. समोरची व्यक्ती आतून पुष्कळ चांगली आहे, तर संतांमध्ये जो भगवंत आहे, तो स्वतः संतांना त्या व्यक्तीला आशीर्वाद देण्याची प्रेरणा देतो. भगवंत त्यांना सांगतो, ‘अरे, ही व्यक्ती चांगली आहे. तू तिला आशीर्वाद दे.’ अध्यात्मात आपल्याला वाटते, तसे काही मानसिक स्तरावर नाही, तर सर्व या प्रकारे आध्यात्मिक स्तरावर होत असते.

आ. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र !

हिंदुत्वनिष्ठ : मी साधना शिकेन.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधना म्हणजे प्रत्यक्ष कृती करायची आहे. त्यानंतर प्रतिदिन साधना चालूच ठेवायची आहे. कोणताही विषय शिकण्यासाठी महाविद्यालयात २ – ३ वर्षे अभ्यास केला, तर तो शिकून होतो. साधनेत असे नाही. जीवनभर, म्हणजे ईश्वरप्राप्ती होईपर्यंत साधना करावी लागते !

एक साधक आणि साधिका येथे आले होते. ती साधिका नामजप इत्यादी करत आहे. तिला अनुभूती येतात. तिचा पती साधना करत नाही. त्या साधिकेने अनुभूती सांगितली, तर तिचे पती एकदम अहंयुक्त बोलले, ‘‘मी नामजप करत नाही; परंतु माझ्याजवळ नामजपाचे ५०० ग्रंथ आहेत. मी त्यांचा अभ्यास केला आहे.’’ म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी पुस्तक आणले आहे; परंतु स्वयंपाक केला नाही, तर त्याचा काय लाभ होणार ? अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे.